Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआहेर राष्ट्रीय आहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित

आहेर राष्ट्रीय आहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित

नाशिक l Nashik

जागतिक महिला दिनानिमित्त श्री साई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित संस्थापक अध्यक्षा संगीता पाटील यांनी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व युवतींचा राष्ट्रीय अहिल्यारत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गार्गी आहेर हिस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई आयोजित शिवजयंती २०२१ निमित्त ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्या बद्दल राष्ट्रीय अहिल्यारत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भुवनसिंहराजे होळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजच्या युगात आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवावी असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमास डॉ. शेफाली भुजबळ, इंडिया दर्पणचे साहित्य व संस्कृती विभागाचे संपादक देविदास चौधरी, अभिनेत्री स्मिता प्रभु, डॉ. प्रशांत देवरे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या