Friday, April 25, 2025
HomeनगरAccident News : बस-दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू

Accident News : बस-दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला. आण्णासाहेब मच्छिंद्र मोकाटे (वय 40 रा. इमामपूर ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर खोसपुरी (ता. नगर) शिवारात सिंहगड हॉटेलसमोर मंगळवारी (12 नोव्हेंबर) सायंकाळी 5:50 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी मयत आण्णासाहेब मोकाटे यांच्या पत्नी आश्‍विनी आण्णासाहेब मोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाई बस (एमएच 12 व्हीएफ 4034) चालक हनुमान भगवान गिते (पूर्ण पत्ता नाही, रा. बीड) याच्याविरूध्द गुरूवारी (14 नोव्हेंबर) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आण्णासाहेब मोकाटे हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्याकडील दुचाकीवरून (एमएच 16 एएम 6637) अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना खोसपुरी शिवारात सिंहगड हॉटेलसमोर बस चालक हनुमान गिते याने बसची दुचाकीला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आण्णासाहेब मोकाटे यांचा मृत्यू झाला.

बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही हयगयीने व अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून जोराची धडक देऊन अपघात केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शेख करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...