Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : बोल्हेगावात तिघा भावांवर रॉड व दांडक्याने हल्ला

Crime News : बोल्हेगावात तिघा भावांवर रॉड व दांडक्याने हल्ला

आठ जणांविरूध्द तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव येथे शुक्रवारी (8 ऑगस्ट) रात्री तिघा भावांवर लोखंडी रॉड, लाकडी दांडे व दगडांनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ओंकार कांबळे, त्याचा दाजी गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही), सुदर्शन पवार उर्फ लाल्या, सुयेश जाधव, सागर व पंकज (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) व दोन अनोळखी इसम यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

साजिद लतीफ शेख (वय 27, रा. आदेश लॉन पाठीमागे, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रात्री साडेआठच्या सुमारास दोस्ती हॉटेलमध्ये मित्रासोबत बसल्यावर ओंकार कांबळे व त्याचे साथीदारांनी किरकोळ कारणावरून वाद घालून शिवीगाळ केली. तेव्हा उपस्थित नागरिकांनी वाद मिटवला. परंतु त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास ओंकार कांबळे, त्याचा दाजी गायकवाड, सुदर्शन पवार, सुयेश जाधव, सागर, पंकज व इतर दोन जण चार दुचाकीवरून फिर्यादीच्या घरी आले.

YouTube video player

त्यावेळी ओंकार कांबळे याने लोखंडी रॉडने फिर्यादी साजिद शेख यांच्या डोक्यावर मारहाण केली, तर सुदर्शन पवारने लाकडी दांडक्याने हात व छातीवर वार केले. इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. आवाज ऐकून फिर्यादीचे भाऊ सद्दाम शेख व शहाबाज शेख बाहेर आले असता, त्यांच्यावरही लोखंडी रॉड, दांडे व दगडांनी हल्ला करण्यात आला. संशयित आरोपींनी हे माजलेत, मारून टाका अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे.

घटनेनंतर संशयित आरोपींनी एमएच 16 डीआर 6949 व एमएच 16 व्ही 7180 या क्रमांकाच्या दोन दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...