Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar News : 4 किलो आरडीएक्स बॉम्बने जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देवू

Ahilyanagar News : 4 किलो आरडीएक्स बॉम्बने जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देवू

पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाची धावाधाव

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच चार आरडीएक्स बॉम्बचा स्फोट (RDX Bomb Explosion) होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांना बाहेर काढा….अशी धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (18 डिसेंबर) सकाळी 9.19 वाजता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Collector Dr. Pankaj Ashiya) यांना आल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाने श्वानासह जिल्हाधिकारी कार्यालयाची दोन तास कसून तपासणी केली. पण यात काहीही संशयास्पद आढळले नाही. या तपासणीच्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील (Ahilyanagar Collector Office) अधिकारी व कर्मचार्यांना बाहेर काढण्यात आले होते. पूर्ण तपासणीनंतर काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांना पुन्हा दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात जाऊ दिले गेले.

- Advertisement -

गुरूवारी सकाळी 9.19 वाजता गैना रमेश नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना हा धमकीचा मेल (Threatening Mail) पाठवला. शुद्ध मराठीत व इंग्रजी भाषेत हा मेल पाठवला गेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात चार आरडीएक्स बॉम्बचा लवकरच स्फोट (Explosion) होणार आहे. दुपारी दोनपर्यंत सर्वांना बाहेर काढा…असा मजकूर या मेलमध्ये मराठी व इंग्रजी भाषेत आहे. हा मेल पाहिल्यावर डॉ. आशिया यांनी पोलिसांना याची माहिती दिली व पोलिसांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

YouTube video player

कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना बाहेर काढून झाडांच्या सावलीत थांबवले गेले व दुसरीकडे पोलिसांनी बॉम्बशोधक पथकातील श्वानाच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोपरा न् कोपरा तपासला. जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याचे वृत्त नगर शहरासह जिल्हाभरात सोशल मिडियाद्वारे (Social Media) व्हायरल झाले. त्यामुळे काहींनी या कार्यालयाकडे धाव घेतली. या दरम्यानच्या काळात पोलिस व बॉम्ब शोध पथकाद्वारे कार्यालय परिसराची कसून तपासणी होत होती. ती दुपारी अडीच सुमारास पूर्ण झाल्यावर व यात काहीही संशयास्पद आढळले नसल्याने दुपारी अडीचच्या सुमारास अधिकारी व कर्मचार्‍यांना पुन्हा त्यांच्या कार्यालयीन कामासाठी कार्यालयात जाऊ दिले गेले. या घटनेची जोरदार चर्चा आहे.

सहा मजले, जिने, पार्किंगची चेकिंग
बॉम्ब शोधक पथकातील लुसी व जंजीर या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी पथकाचेही सहकार्य लाभले.

तपास सायबर सेल करणार
राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा प्रकार केवळ खोडसाळपणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत.

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...