Friday, April 25, 2025
HomeनगरAhilyanagar Crime News : दुचाकीसह पाच तोळ्याचे दागिने लांबविले

Ahilyanagar Crime News : दुचाकीसह पाच तोळ्याचे दागिने लांबविले

अहिल्यानगर । प्रतिनिधी

दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, 12 हजाराची रोकड असा तीन लाख 32 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. मनमाड रस्त्यावरील प्रेमदान चौकातील कोहिनुर मॉल समोर मंगळवारी (5 नोव्हेंबर) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रोनक जितेंद्र शाह (वय 33 रा. गुरूगणेश अपार्टमेंट, माळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी खासगी नोकरी करतात. त्यांचे नातेवाईक संगीता दिलीप चौरडीया (पत्ता नाही) यांच्या नावावर असलेली एक्टिव्हा मोपेड दुचाकी (एमएच 16 एआर 3519) ते वापरतात.

मंगळवारी त्यांचे वडिल जितेंद्र व आई नेत्रा कोहिनुर मॉल येथे सिनेमा पाहण्याकरीता गेले. फिर्यादी व त्यांची पत्नी निरूपमा दुचाकी घेऊन खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते दोघे आई-वडिलांना घेण्यासाठी रात्री साडेसातच्या सुमारास कोहिनुर मॉल येथे गेले. त्यांनी दुचाकी कोहिनुर मॉलसमोर पार्क करून लॉक केली व ते आतमध्ये गेले.

दुचाकीच्या डिक्कीत खरेदी केलेले कपडे, पर्स व त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातले कुडके, हातातील कडे असे पाच तोळ्याचे दागिने, 12 हजाराची रोकड असा ऐवज ठेवला होता. ते सव्वा आठच्या सुमारास दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. दुचाकीसह त्यातील दागिने, रोकड चोरीला गेल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी भेट दिली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार वाय. जी. चव्हाण करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...