Tuesday, May 20, 2025
Homeनगरवाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर- दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद (ता. नगर) शिवारात घडली. साहेबराव वामन वाघमारे (वय 35 रा. कलगाव, ता. जि. हिंगोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत साहेबराव वाघमारे यांचे वडिल वामन मारूती वाघमारे (वय 60 रा. कलगाव, ता. जि. हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली असून गुन्हा शनिवारी (9 नोव्हेंबर) दुपारी दाखल झाला आहे. साहेबराव वामन वाघमारे हे 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता अहिल्यानगर- दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद शिवारात सुजीत सुभाष चोभे यांच्या घरासमोर असताना अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाची साहेबराव वाघमारे यांना धडक दिली.

या धडकेत साहेबराव जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक पसार झाला. त्याने साहेबराव यांना कोणतीही मदत केली नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वामन वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...