Thursday, July 23, 2026
HomeनगरAccident News : नगर-दौंड महामार्गावर कार व ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा...

Accident News : नगर-दौंड महामार्गावर कार व ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा दौंड महामार्गावर (Shrigonda Daund Highway) घारगाव ते कोळगाव दरम्यान माऊली मंदिरा जवळपहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मालट्रक आणि कारची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Car and Truck Accident) चार जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

यात कारचा चालक नितीन अनिल कोकाटे (रा. काष्टी वय 22) याच्यासह गाडीतील गजानन जनार्धन पायघन (वय 47), दुर्पा गजानन पायघन (वय 36), वैभव गजानन पायघन (वय 19) या आई-वडील आणि मुलाचा मृत्यू (Death) झाला असून त्या कुटुंबातील करण गजानन पायघन (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी (Injured) असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पायघन कुटुंबीय हे अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर (Maltur) येथील मुळ राहणारे आहेत.

कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील चिंभळे गावात राहत होते. काष्टी (Kashti) येथील मयत चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. आज ते त्यांच्या गावाकडून चिंभळे गावाकडे येत असतांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारात माऊली मंदिर परिसरात दौंडकडून नगरकडे (Ahilyanagar) जाणार्‍या ट्रकची घारगावच्या (Ghargaon) दिशेने येणार्‍या इको कारला समोरून जोराची धडक बसली यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली.

ताज्या बातम्या

Sangamner : विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये समविचारी पक्ष व विविध संघटनांच्या वतीने विराट मशाल मोर्चा काढण्यात...