Friday, July 24, 2026
HomeनगरAccident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; अपघातानंतर दोन्ही ट्रकांनी घेतला पेट

Accident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; अपघातानंतर दोन्ही ट्रकांनी घेतला पेट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दौंड महामार्गावरील (Daund Highway) खंडाळा गावाजवळ शनिवारी दोन ट्रक समोरासमोर धडकून (Truck Accident) लागलेल्या आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाल्या. यापैकी एका ट्रकचा ड्रायव्हर गाडीची काच फोडून सुखरूप बाहेर आला तर दुसर्‍या ट्रकच्या ड्रायव्हर व त्याच्या सहायकाला जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी गाडीबाहेर काढून वाचवले. आगीची धग लागल्याने हे दोघेही जखमी असून, त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले आहे.

- Advertisement -

एक ट्रक दौंडहून कापड घेऊन धुळ्याकडे चालला होता व दुसरा ट्रक नगरहून (Nagar) स्टील (लोखंड) भरून दौंडकडे चालला होता. खंडाळा गावाजवळ एका पिकअप् व्हॅनने कापड भरलेल्या ट्रकला हुल दिल्याने त्यावरील चालकाचे नियंत्रण सुटून तो समोरून स्टील घेऊन येणार्या ट्रकला (Truck) धडकला. खंडाळ्यात (Khandala) या महामार्गाजवळच राहणारे संदेश कार्ले धडकेचा आवाज ऐकून अवघ्या दोन-तीन मिनिटात घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत एका ट्रकचा ड्रायव्हर गाडीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला मदतीचा हात देऊन सुखरूप बाहेर काढले गेले. दुसर्‍या ट्रकमध्ये ड्रायव्हर व त्याचा सहायक अडकले होते. त्यांनाही मग कार्ले व अन्य ग्रामस्थांनी मदतीचा हात देऊन बाहेर काढले.

या दोघांना बाहेर काढताच क्षणार्धात दोन्ही ट्रकने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा निर्माण झाल्या. त्यामुळे मनपा अग्नीशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांना फोन केल्यावर त्यांनी 10 ते 15 मिनिटात दोन गाड्या पाठवल्या. त्यांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मनपाच्या दोन्ही गाड्यांतील पाणी संपले. यामुळे जवळच्याच शेतातील विहिरीवरील पाणी उपसा करणारी वीज मोटार सुरू करून मनपाच्या अग्निशामक (AMC Fire Department) गाड्या भरल्या गेल्या, तोपर्यंत जेसीबी बोलावून ट्रकमधील कापडाचे गठ्ठे बाहेर काढले गेले व मग पुन्हा अग्नीशामक गाड्यांनी पाण्याचे जोरदार फवारे मारून दोन्ही ट्रकची आग नियंत्रणात आणली.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...