Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar News: विधानसभेत पराभूत थोरात, तनपुरे, शिंदे यांच्यासह आठ उमेदवारांची खंडपीठात धाव!

Ahilyanagar News: विधानसभेत पराभूत थोरात, तनपुरे, शिंदे यांच्यासह आठ उमेदवारांची खंडपीठात धाव!

अहिल्यानगर । प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील आठ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक याचिका दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता.

- Advertisement -

निवडणूक प्रक्रियेतील आक्षेप

YouTube video player

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांवर काही आक्षेप घेतले गेले होते. याचिकाकर्त्यांनी मतदार यादीतील बदल, आचारसंहितेचा भंग, आणि मतमोजणी प्रक्रियेतील त्रुटी यावर आक्षेप नोंदवले आहेत.

कोणाविरुद्ध याचिका दाखल?

बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ यांच्या विरोधात याचिका केली.
राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्या विरोधात याचिका केली.
अभिषेक कळमकर (अहमदनगर) यांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात याचिका केली.
प्रताप ढाकणे (शेवगाव) यांनी मोनिका राजळे यांच्या विरोधात याचिका केली.
प्राजक्त तनपुरे (राहुरी) यांनी शिवाजी कर्डीले यांच्या विरोधात याचिका दाखल केली.
अमित भांगरे (अकोले) यांनी किरण लहामटे यांच्यावर
राणी लंके (पारनेर) यांनी काशिनाथ दाते यांच्यावर
संदीप वर्पे (कोपरगाव) यांनी आशुतोष काळे यांच्यावर याचिका दाखल केली आहे.

पुढील निर्णयाकडे लक्ष

या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीशी संबंधित या याचिकांवर न्यायालयाचा निकाल काय राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या