Thursday, February 5, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेने पार केला 11 हजार कोटींचा टप्पा

Ahilyanagar : जिल्हा बँकेने पार केला 11 हजार कोटींचा टप्पा

नववर्षाची अर्थभरारीने सुरूवात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय सुदृढ असून जिल्हा बँकेवर ठेवीदार, शेतकर्‍यांचा विश्वास असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 ला जिल्हा बँकेच्या ठेवींनी 11 हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेची नववर्षातील मोठी भरारी असून या पुढे जिल्हा बँक अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रात भरारी घेणार असल्याचा विश्वास बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अधिक माहिती देतांना चेअरमन घुले पाटील यांनी सांगितले, जिल्हा बँकेने आता ग्राहकांसाठी सोने तारण कर्जामध्ये जास्तीतजास्त ग्राहकांना फायदा होण्यासाठी अल्प दरात सोनेतारण कर्ज उपलब्ध केले आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत जिल्हा बँकेचे सोने कर्जात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बँकेने नुकतेच महावितरणचे बिल पेमेंट घेण्यासाठी ग्राहकांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील व्यापारी, ग्राहक, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, शाळा, कॉलेज, खाजगी संस्था आदींनी जिल्हा बँकेचा क्यूआर कोड घेऊन व्यवहार सुरक्षित आणि जलद उपलब्ध करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

लवकरच अहिल्यानगर येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये 24 तास आणि सातही दिवस स्वयंचलित बँकिंग सेवा देण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या ईलॉबीमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटर, चेक डिपॉझिट मशीन, तक्रार नोंदणी सुविधा इत्यादी सेवा एकाच ठिकाणी ई-लॉबीमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या ईलॉबीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही बँके प्रशासनाने दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...