Thursday, November 5, 2026
HomeनगरAhilyanagar : दिवाळीनंतरच मिळणार बँकेला नवे कारभारी

Ahilyanagar : दिवाळीनंतरच मिळणार बँकेला नवे कारभारी

अनेक नावे स्पर्धेत || कोण बाजी मारणार, याकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, बँकेवर सहकार विकास आघाडीची सत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सहकार विकास आघाडीकडून बँकेचा पुढील चेअरमन कोण होणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. निकालानंतर अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेदरम्यानच अध्यक्षपदाचा उमेदवार आणि बँकेचे नवे कारभारी निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे. या अधिसूचनेनुसार संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात येईल. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यास मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया दिवाळीनंतर राबविण्यात येणार असून, त्यासाठी संचालक मंडळाच्या सभेची अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निकालानंतर आता पुढील चेअरमन कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चेअरमनपदासाठी विखे गटाकडून कोणाचे नाव पुढे येणार? थोरात गटाला उपाध्यक्षपद मिळणार का? की भाजप आणि थोरात गटाला मान्य असलेल्या एखाद्या नावावर एकमत होणार? तसेच बँकेच्या अध्यक्षपदी महिलेला संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असली, तरी बँकेचा नवा कारभारी कोण असेल, याचे चित्र दिवाळीनंतरच स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना डबल दिलासा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 293 शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 1 हजार 369 कोटी 69...