Friday, October 23, 2026
HomeनगरAhilyanagar : 2 नोव्हेंबरला मतदान; 3 नोव्हेंबरला मतमोजणी

Ahilyanagar : 2 नोव्हेंबरला मतदान; 3 नोव्हेंबरला मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून पॅनल प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मतदानापूर्वी करावयाची तयारी, मतपत्रिका आणि मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीबाबत गुरुवारी झालेल्या चिन्ह वाटपप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी सर्व मंडळांचे प्रमुख, पॅनलचे प्रतिनिधी आणि अपक्ष उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या निवडणुकीत मतदारसंघनिहाय मतपत्रिका असून त्यांचे रंगही वेगवेगळे राहणार आहेत. तसेच मते बाद होऊ नयेत, यासाठी सर्व मंडळ आणि पॅनल प्रमुखांनी सभासदांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

बँकेच्या नगरमधील चाहूराणा शाखेच्या सभागृहात विविध मंडळांना चिन्ह वाटप करताना अधिकारी सुरवसे बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय मतपत्रिका, त्यांचे वेगवेगळे रंग, महिलांसाठी स्वतंत्र मतपत्रिका, मतदान करण्याची पद्धत, मते बाद होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी (उदा. योग्य पद्धतीने शिक्के मारणे) तसेच मतदान केंद्रापासून ते मतमोजणी केंद्रापर्यंतच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली. मतदान व मतमोजणी प्रतिनिधीबाबत मार्गदर्शक सूचनाबँकेच्या निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेली व्यक्तीच ममतदान आणि मतमोजणी प्रतिनिधीफ म्हणून नेमली जाऊ शकते.

अशा प्रतिनिधींना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. मतदान प्रतिनिधींनी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच आक्षेप नोंदवणे बंधनकारक राहणार असून, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच, मतदान प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान पेटी सील होईपर्यंत केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे, अशा सक्त सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

लवकरच मतदान व मतमोजणी केंद्राची यादी
लवकरच केंद्र व मतमोजणी ठिकाणांची यादी जाहीर होणारजिल्हा बँक निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून लवकरच मतदान केंद्र आणि मतमोजणी ठिकाणांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी एकनाथ घोगरे यांची याचिका छत्रपती संभाजीनगर...