Thursday, October 29, 2026
HomeनगरAhilyanagar : नेते प्रचारात, मतदार सहलीत अन् निवडणूक यंत्रणा तयारीत व्यस्त

Ahilyanagar : नेते प्रचारात, मतदार सहलीत अन् निवडणूक यंत्रणा तयारीत व्यस्त

निवडणूक कर्मचार्‍यांना सहकार सभागृहात प्रशिक्षण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँक मतदानासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दगाफटका टाळण्यासाठी निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी सभासद मतदारांना सहलीवर पाठवले, तर नेत्यांनी उमेदवारांसाठी फिल्डिंग लावली आहे. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेते प्रचार, मतदार सहलीला आणि निवडणूक यंत्रणा मतदान आणि मतमोजणीच्या तयारीत व्यस्त दिसत आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या सहकार सभागृहात मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी 2 नोव्हेंबरला मतदान होत आहे. या 10 जागांसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकार विकास मंडळाने 11 जागा यापूर्वी बिनविरोध करून जिंकल्या आहेत. त्यांचे बहुमत झाले असले तरी उर्वरित 10 जागांही त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहे. त्यात पारनेर, राहुरी, कर्जत आणि अकोले या चार सोसायटीच्या जागा मिळविणे मंडळाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. राखीव सहा जागाही या मंडळाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. मात्र त्यासाठी जागांसाठीची लढत एकतर्फी असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी चार सोसायटीच्या जागांच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मतांची जुळवाजुळव, नाराजांची मनधरणी, मतदारांची बांधणी, संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. विशेषतः पारनेर, राहुरी, अकोले, कर्जत या सोसायटीच्या लढतीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडीपुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाची कसोटी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी, उमेदवारांची रणनीती आणि मतदारांची भूमिका यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, राजकीय नेते आणि निवडणुकीतील उमेदवारांच्या तयारीप्रमाणे निवडणूक यंत्रणेतील तयारीला महत्व आले आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत काही त्रुटी राहू नयेत, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सर्वोतरीने प्रयत्न सुरू आहेत. याचा भाग म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचार्‍यांना सहकार सभागृह या ठिकाणी मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोपरगाव, राहुरीत तीन ठिकाणी छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत येथील अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव आणि राहुरी येथे तीन ठिकाणी...