Wednesday, September 2, 2026
HomeनगरAhilyanagar District Bank : जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर शेवटच्या दिवशी हरकतींचा...

Ahilyanagar District Bank : जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना करण्याच्या सोमवारी अखेरच्या दिवशी हरकर्तीचा पाऊस पडला. नावात बदल, लिंग बदल यासह जुना ठराव रद्द करण्याबाबतही हरकती आल्याचे सांगण्यात आले आहे.

२७ ऑगस्टपर्यंत ३४ हरकती आल्या होत्या. त्यात आता मोठी वाढ झाल्याचे जिल्हा निवडणूक तथा जिल्हा उपनिंबधक यांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हरकर्तीचा पाऊस पडल्याने सहकार विभाग हँग झाल्याचे चित्र होते.

सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या यादीवर ३१ पर्यंत हरकती व सुचना करण्याची मुदत आहे. सोमवारी हरकतीचा शेवटचा दिवस असल्याने हरकती दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या हरकतीचे स्वरूप नावात बदल, लिंग बदल असे असले तरी प्रामुख्याने जुना ठराव बदलण्याबाबत देखील हरकती व सुचना आल्या आहे. अर्थात त्या व्यक्तीगत स्वरूपाच्या हरकती आहे. त्यांना संस्थाचा आधार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही अपात्र झालेले ठराव पात्र करण्याबाबत देखील अर्ज आले आहेत.

प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सुनावणी होवून अंतिम मतदार यादी १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंदाज १५ ते २० दिवसांनी जाहीर होईल. दरम्यान, यंदा निवडणुकीसाठी बँकेचे ३ हजार ६७७ मतदार आहेत. त्यात ३६६ संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून २३३ संस्थांनी ठराव सादर केले नाहीत. ३१ ते १० ऑगस्टपर्यंत हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...