Friday, April 25, 2025
Homeनगरजिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

24 जानेवारीला प्रसिध्द होणार अंतिम प्रभाग रचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2 डिसेंबर पासून प्रभाग रचनेला प्रारंभ होणार आहे. तर अंतिम प्रभाग रचना 24 जानेवारीला प्रसिध्द करण्यात येणार आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कोकणगाव, मांडवगण, महांडूळवाडी, राजापूर, दानेवाडी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील मसे खुर्द व राळेगाव थेरपाळ, संगमनेर तालुक्यातील काकावाडी व नान्नज दुमला या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अकोले तालुक्यातील साकीरवाडी व दिगंबर तर कर्जत तालुक्यातील कोळवडी, बनवडी या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशा एकूण जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या 84 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना, मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. विधानसभा निवडणुक व सरपंच आरक्षणा अभावी या निवडणुका अद्याप ही झाल्या नाहीत. येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...