Friday, April 25, 2025
Homeनगरनगर जिल्ह्यासाठी 27 कोटी 60 लाखांचा आमदार निधी

नगर जिल्ह्यासाठी 27 कोटी 60 लाखांचा आमदार निधी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या 288 नूतन आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी एक कोटी 80 लाख रुपयांचा आमदार निधी 682.34 कोटी रुपये इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. यात नगर जिल्ह्यातील विधानसभेतील 12 आमदार आणि विधानपरिषदेचे 2 आमदार यांना प्रत्येकी 3 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

- Advertisement -

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता रु.2200.00 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतुदीपैकी संदर्भाधीन क्र.2 येथील परिपत्रकान्वये वित्त विभागाने या कार्यक्रमांतर्गत निधी वितरित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान केलेले आहेत. वित्त विभागाने सन 2024-25 मधील अर्थसंकल्पीत निधीपैकी रु.1146.00 कोटी एवढा निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी रु.1009.77 कोटी इतका निधी सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत वित्त विभागाकडून रु.546.11 कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यानुसार बीम्स प्रणालीवर यापूर्वीचा शिल्लक रु.136.23 कोटी व वित्त विभागाकडून प्राप्त रु.546.11 कोटी असा एकूण रु.682.34 कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे.

ना. राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील, आशुतोष अशोकराव काळे, डॉ. किरण यमाजी लहामटे, अमोल धोंडिबा खताळ, विठ्ठल वकिलराव लंघे, मोनिका राजीव राजळे, शिवाजी भानुदास कर्डिले, काशिनाथ महादु दाते, हेमंत भुजंगराव ओगले, संग्राम अरूणकाका जगताप, विक्रम बबनराव पाचपुते, रोहित राजेंद्र पवार या विधानसभा सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी 80 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. तर विधान परिषदेचे सदस्य प्रा. राम शंकर शिदे, सत्यजित सुधीर तांबे यांना प्रत्येकी 3 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...