Sunday, May 18, 2025
HomeनगरAhilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

जिल्ह्यात उद्या ऑरेंज तर 21 पर्यंत यलो अलर्ट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात आणि महसूल मंडलात किती पाऊस झाला याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाच्या आकडेवारीबाबत कृषी विभागाकडून नेमण्यात आलेल्या खासगी हवामान कंपनीकडून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून नगर जिल्ह्याला सोमवार (दि.19) रोजी पावसाचा ऑरेंज तर 21 तारखेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात वळवाच्या सरीसोबत काही ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात 14 तालुक्यांत जुन्या 96 आणि वाढीव 32 महसूल मंडळांत कृषी विभाग आणि स्कायमेट या कंपनीत करार होऊन त्याठिकाणी अद्ययावत हवामान यंत्रणा बसवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्यापासून पडणार्‍या पावसाची अद्यावत माहिती संबंधित कंपनीकडून जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला मिळालेली नाही.

यामुळे कोणत्या तालुक्यात आणि महसूल मंडळात किती पाऊस झाला. या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टी याचे प्रमाण कसे ठरवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी कृषी विभागाकडे तर कृषी विभागाने संबंधित खासगी हवामान कंपनीकडे बोट दाखवले आहे. यामुळे गेल्या चार दिवसांत कोणत्या भागात किती पाऊस झाला याचा डाटा उपलब्ध नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा विषय राज्य पातळीवरील असल्याने कोण कोणाला सुचना करणार असा प्रश्न आहे. पावसाची अद्यावत आकडेवारी उपलब्ध न झाल्यास नुकसान शेतकर्‍यांना भरपाई कशी मिळणार असा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यात दमदार अवकाळी पाऊस झालेला असून त्याबाबत ठोस आकडेवारी नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 42 गुणनियंत्रकांची कृषी केंद्रांवर राहणार करडी नजर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकर्‍यांना योग्य दरात दर्जेदार बियाणे खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने नियोजन आखले आहे. जिल्ह्यात कृषी...