Wednesday, June 17, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरात नवे पोलीस अधिकारी, काहींना मुदतवाढ

Ahilyanagar : अहिल्यानगरात नवे पोलीस अधिकारी, काहींना मुदतवाढ

नाशिक परिक्षेत्रातील बदल्या || अनेक अधिकारी जिल्ह्याबाहेर फेकले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अशा 137 पोलिसांच्या बदल्याबाबतचे आदेश गुरूवारी (4 जून) काढण्यात आले. यामध्ये काही अधिकार्‍यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती दिली तर काही अधिकार्‍यांची बदली अमान्य करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अनेक अधिकार्‍यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व संजय सोनवणे यांची अहिल्यानगरहून जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि उध्दव डमाळे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, किरण शिंदे यांची विनंती बदली अमान्य केली आहे. तर, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एक वर्ष मुदतवाढ घेतली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची जळगाव येथे, आशिष शेळके यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून शंकर मुटेकर आणि प्रदीप एकशिंगे, नाशिक ग्रामीण येथून चेतन लोखंडे आणि विकास ढोकरे अहिल्यानगर येथे बदलून आले आहेत. तर, गणेश अहिरे यांची बदली अमान्य केली आहे. माणिक चौधरी यांनी एक वर्ष मुदतवाढ घेतली आहे.

पोलीस उपनिरीक्षकांचे नाव व कंसात बदली ठिकाण : फराहनाज पटेल (अमान्य), चंद्रभान जाधव (नाशिक ग्रामीण), शलमोन सातपुते (अमान्य), अनंत सालगुडे, प्रियंका आठरे, रणजीत मारग, मनोज मोंढे, सचिन लिमकर (मुदतवाढ), तुषार धाकराव, उमेश पतंगे (नाशिक ग्रामीण), संदीप ढाकणे (धुळे), संपत कन्हेरे (जळगाव). तसेच पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, गणेश कुटे, किरण जगदाळे, किरण कोठुळे, किशोर जाधव, गणेश आघाव, समाधान सोळुंके, परसराम तागड, अमोल गर्जे, सुहास आव्हाड, संदीप दरवडे, विजयकुमार कोठावळे हे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत.
जिल्ह्यात लवकरच खांदेपालट

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी नाशिक परिक्षेत्रातील बदलीचे आदेश काढले असल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडूनही जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या दोन ते चार दिवसांत केल्या जाणार आहेत. अनेक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात येणार असून काही ठाणेदार वादग्रस्त ठरले आहेत, त्यांची बदली करण्यात येणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या हॉटेल कामत समोर रविवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने....