Wednesday, November 4, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 1 नोव्हेंबरपर्यंत 124 साखर कारखान्यांकडून 77.07 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांनी 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 97.46 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.91 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 60 सहकारी आणि 64 खाजगी कारखाने सुरु झाले आहेत. अन्य कारखानेही लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 53 साखर कारखाने सुरु झाले होते. त्यामध्ये 23 सहकारी आणि 30 खासगी कारखान्यांचा समावेश होता.

- Advertisement -

सध्या सोलापूर विभागात सर्वाधिक 27 साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामध्ये 10 सहकारी आणि 17 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 17.81 लाख टन उसाचे गाळप करून 13.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.37 टक्के इतका आहे. सोलापूर पाठोपाठ नांदेड विभागात 26 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 9 सहकारी आणि 17 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 13.06 लाख टन उसाचे गाळप करून 9.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 6.98 टक्के आहे. अहिल्यानगर विभागातील 20 कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. त्यामध्ये 11 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 7.86 टक्के उतार्‍यासह कारखान्यांनी 16.61 लाख टन ऊस गाळप करून 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

पुणे विभागात 22 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 15 सहकारी आणि 7 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल 27.08 लाख टन उसाचे गाळप झाले असून 23.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा 8.71 टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 14 कारखाने सुरु झाले आहे. त्यामध्ये 6 सहकारी आणि 8 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 11.89 लाख टन उसाचे गाळप करून 8.47 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा केवळ 7.12 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत केवळ 13 कारखानेच सुरु झाले आहेत. त्यामध्ये 9 सहकारी आणि 4 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. अन्य साखर कारखाने ऊसदराचा तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विभागात 9.7 लाख टन उसाचे गाळप होऊन 8.76 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 9.03 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 2 खाजगी कारखाने सुरु असून आतापर्यंत 1.31 लाख टन उसाचे गाळप होऊन 0.95 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.25 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झाला नसल्याचे दिसते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिवाळीनंतरच मिळणार बँकेला नवे कारभारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, बँकेवर सहकार विकास आघाडीची सत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सहकार विकास आघाडीकडून बँकेचा पुढील...