Thursday, September 24, 2026
Homeनगरविखे-पाटील खासगी आरोग्य विद्यापीठ

विखे-पाटील खासगी आरोग्य विद्यापीठ

विळद घाट येथे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचे सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांच्याशी संबंधित खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेला सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील तर नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर येथील विळद घाट येथे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशन या संस्थेने आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे 830 खाटांचे रुग्णालय देखील आहे.

तर नागपूर येथे व्ही.एस.पी.एम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे 1 हजार 138 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आहे.

या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मार्गदर्शक तत्वांनुसार निरीक्षण समितीकडून पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर काल मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...