Tuesday, September 1, 2026
HomeनगरAhilyanagar Voter List : जिल्ह्यातील सव्वा चार लाखांहून अधिक मतदारांची नावे रद्द

Ahilyanagar Voter List : जिल्ह्यातील सव्वा चार लाखांहून अधिक मतदारांची नावे रद्द

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अंतर्गत राबविण्यात आलेल्या मतदार यादी पडताळणीत अहिल्यानगर जिल्ह्यात ३८ लाख १० हजार मतदारांपैकी ४ लाख २६ हजार ९३० (११.२२ टक्के) मतदार मयत, दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित (असंकलित मतदार) आढळून आले होते, ही नावे वगळण्यात आली आहेत. ३१ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारांची प्रारूप मतदार प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यांचे निराकरण २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. आयोगाने दिलेल्या शिशी. शलळ. सौं.ळप या वेबसाईटवर आपले नाव मतदार यादीत बघता येणार आहे. तसेच बीएलओकडूनही याची माहिती घेता येईल. सुनावणी दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष तयार करण्यात आला आहे. तालुकास्तरावर समन्वयासाठी तालुकास्तरीय अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचा मिळून एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. असंकलित मतदारांचे (मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित) आवश्यक ते रेकॉर्ड बीएलओंनी जतन करून ठेवावे, तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर नमुना ६, ७ व ८ पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

वगळलेले मतदार

मयत मतदार १ लाख ४१ हजार २१२
गैरहजर ५० हजार १६७
कायमस्वरूपी स्थलांतरित १ लाख ७१ हजार ७१९
इतर मतदार १ हजार १२५
यापूर्वीच नोंदणी झालेले ६२ हजार ७०७

दावे-हरकती दाखल करा

मतदार यादीत नाव, स्पेलिंग, वय/जन्मतारीख, फोटो, पत्ता, मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र योग्य आहे का, हेही तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील. त्यावर सुनावणी होईल. नवीन नाव नोंदणीसाठी / वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरावा.

जिह्यातील मतदारांची आकडेवारी

प्रारुप मतदार यादीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदारांची संख्या ३३ लाख ८३ हजार १८७ इतकी आहे. यात अकोले २ लाख ५२ हजार २५१, संगमनेर २ लाख ६३ हजार ११४, शिर्डी २ लाख ५३ हजार ५४४, कोपरगाव २ लाख ५० हजार ०७६, श्रीरामपूर २ लाख ७४ हजार ७२६, नेवासा २ लाख ६५ हजार ३८९, शेवगाव ३ लाख ३५ हजार ५५७, राही २ लाख ९५ हजार ६७२, पारनेर ३ लाख १९ हजार ६०९, अहमदनगर शहर २ लाख ४६ हजार ४२४, श्रीगोंदा ३ लाख ८ हजार ११६. कर्जत जामखेड ३ लाख १८ हजार ७०९ आणि एकूण मतदार ३३ लाख ८३ हजार १८७.

ताज्या बातम्या

पीएनजी

सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ, घरखर्चाच्या बजेटवर होणार परिणाम; दुध, पीएनजी, सीएनजीच्या...

0
मुंबई | Mumbaiसप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारे अनेक बदल लागू झाले आहेत. दूध, CNG, PNG, रिक्षा-टॅक्सीचे भाडे, व्यावसायिक LPG सिलिंडर...