Wednesday, November 18, 2026
Homeनगरअवघ्या महिनाभरात चारा टंचाईचे संकट; नगर, पारनेर, जामखेड, पाथर्डी तालुक्यात महिनाअखेर बिकट...

अवघ्या महिनाभरात चारा टंचाईचे संकट; नगर, पारनेर, जामखेड, पाथर्डी तालुक्यात महिनाअखेर बिकट स्थिती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात सध्या दोन ते अडीच महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यातही नगर, पारनेर, जामखेड व पाथर्डी या चार तालुक्यात महिन अखेरपासून चाऱ्यासाठी धावधाव सुरू होणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना आतापासून राबविण्यात येत आहे. मात्र, या उपाययोजनामधून उपलब्ध होणार चारा आणि आवश्यक असलेला चारा यात मोठी तफावत पडणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पशूधन वाचविण्यासाठी चारा कोठून उपलब्ध होणार याबाबत प्रश्न चिन्ह आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात असणारे लहान-मोठे पशूधन, त्यातून उत्पादन होणारे दुध व आवश्यक चारा याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सध्या गाव व शेतकरीनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात १ लाख ७६ हजार ११८ पशुपालकांच्या घरोघरी जावून पशुधनासह उपलब्ध चारा व रब्बीसाठी योग्य क्षेत्र अशी माहिती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात असलेल्या पशुधनला दररोज २९ हजार ८४१ मेट्रीक टन चारा लागलो. दर महिन्यांला ८ लाख ९५ हजार २४३ मेट्रीक टन चारा या पशुधनासाठी लागतो. ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २४ लाख ३५ हजार ५४६ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. त्यात हिरवा, मुरघास व वाळलेला अशा चाऱ्याचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील आकडेवारीनुसार असलेला पुढे दोन ते अडीच महिनेच पुरणार आहे. त्यानंतर चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. अर्थात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. अशा ठिकाणी नव्याने चाराची निर्मिती होणार असून तो चार जानेवारीमध्ये उपलब्ध होईल, त्यामुळे जिल्ह्यात पशुधनासाठी नव्याने चारा जानेवारीमध्ये लगेच उपलब्ध होईल. मात्र तो आवश्यकते पेक्षा कमी असणार आहे.

सध्या तरी प्रशासनाकडून नव्याने चार निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्यात निकृष्ठ चारा पुरन्हा सकस करणे, हायड्रोपॉनिक चाऱ्याची निर्मिती करणे तसेच सिंचन व्यवस्था असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना चारा बियाणे उपलब्ध करून चारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, चाराटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून पुशपालकांचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यात १ लाख ७६ हजार ११८ पशुपालकांच्या घरोघरी जावून पशुधनासह उपलब्ध चारा व रब्बीसाठी योग्य क्षेत्र अशी माहिती घेण्यात आली आहे. तसेच दुभती व भाकड जनावरांची माहिती यात घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ११८ पशुपालकांकडे गाय वर्ग लहान अशी १ लाख ७३ हजार १२८ जनावरे आहेत. तर गाय वर्ग मोठीमध्ये ७ लाख २४ हजार ५३ जनावरे आहे. लहानमध्ये एक वर्षाखालील तर मोठीमध्ये १ वर्षापुढील जनावरांचा समावेश करण्यात आला आहे. अशी दोन्ही मिळून ८ लाख ९७ हजार १७१ जनावरे आहेत. म्हैस वर्गात लहान २६ हजार ५९१ तर मोठी ९६ हजार ११० अशी एकत्रित १ लाख २२ हजार ७०१. शेळ्या ७ लाख ३३ हजार ३०३ तर मेंढ्या २ लाख ३४ हजार ७८६ आहेत.

ऊस तोडणीसाठी यंत्र वापरू नका

जिल्ह्यात यंदा चारा टंचाईचे सावट आहे. यामुळे ऊस तोडणी करतांना साखर कारखान्यांनी यंत्रणाऐवजी माणसांच्या मार्फत ऊसाची तोडणी करावी, असे पत्र साखर आयुक्तालयाच्यावतीने काढण्यात आले आहे. मजूरांनी तोडलेल्या ऊसापासून निघणारे वाढे हे चार म्हणून वापरता येत असल्याने यंदा ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर टाळण्यात आलेला आहे.

३२ लाख ७७ हजार लिटर दुधाचे उत्पादन

जिल्ह्यात पशुपालकांच्या सर्वेक्षणात गाय वर्गाचे ८ लाख ९७ हजार १८१ तर म्हैस वर्गात १ लाख २२ हजार ७०१ जनावरे आहेत. त्यात दुभाती जनावरे ३ लाख ९४ हजार ८३० तर भाकड जनावरांची संख्या २ लाख ५० हजार ५७६ एवढी आहे. दुभत्या जनावरांपासून ३२ लाख ७७ हजार ४७५ लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यात सरासरी दररोज ४६ लाख दूधाचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत ७० टक्के पशुपालकाचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार दुधाचे उत्पादन घेण्यात आले आहे. त्याचा अर्थात दूध उत्पादनात अजूनही घट झालेली नाही, असे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित हॉटेल

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्‍या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि...