Thursday, May 15, 2025
Homeनगरअहिल्यानगरमध्ये आढळले ‘जीबीएस’ संशयित चार रुग्ण

अहिल्यानगरमध्ये आढळले ‘जीबीएस’ संशयित चार रुग्ण

खासगी रुग्णालयात उपचार सुरू, महापालिकेकडून उपाययोजना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

गुलीयन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) नावाच्या आजाराने पुण्यात थैमान घातले असतानाच अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हे चौघेही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर, तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी जीबीएस संशयित आढळल्याने तिला तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. सदर मुलगी ही जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. तर, शहरातील खासगी रुग्णालयांत तीन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेकडे प्राप्त झाली आहे. त्या तिघांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. खासगी रूग्णालयात आढळलेले रूग्ण आष्टी (बीड), वाकोडी (ता. नगर) व राहुरी तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गुलीयन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात खासगी रूग्णालयात आढळलेले रूग्ण शहरातील नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. संशयित रूग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याच्या सूचना खासगी रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात जीबीएस एकही बाधित रुग्ण नाही. जिल्हा रुग्णालयाकडे एका संशयीत रुग्णांची माहिती आली होती. संबंधीत रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्याला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, संबंधीत संशयीताने नगरमध्ये उपचार घेवून आता तो पूर्ण बरा झाला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. नगरमध्ये जीबीएसची स्थिती सामान्य असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...