Friday, October 2, 2026
HomeनगरCrime News : दरोडा, जबरी चोरीसह पाच गुन्ह्यांची उकल

Crime News : दरोडा, जबरी चोरीसह पाच गुन्ह्यांची उकल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छडा लावत एकाला अटक केली असून त्याच्याकडून दरोडा व जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून गावठी कट्टा व कार असा एकूण आठ लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

बंडू रामदास पांडुळे (रा. वालवड, ता. कर्जत) यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये तसेच अंमलदार फुरकान शेख, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड, भगवान धुळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान तांत्रिक माहिती, बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे पथकाने प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले (वय 32, रा. बाभुळगाव, ता. कर्जत) याला ताब्यात घेतले. त्याने दरोड्याची कबुली देत हा गुन्हा गणेश मंगेश काळे, विशाल हंबरड्या काळे, राम हंबरड्या काळे, किशोर रावण भोसले, साहील रावण भोसले, प्रविण हर्षल भोसले आणि राहुल कांताराज पवार यांच्या साथीने केल्याची माहिती दिली. चोरीतील सोन्याचे दागिने महादेव चंद्रकांत वेदपाठक याच्याकडे दिल्याची कबुलीही दिली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...