Wednesday, January 7, 2026
HomeनगरCrime News : महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर मध्यरात्री हल्ला

Crime News : महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर मध्यरात्री हल्ला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नेप्ती रस्ता, केडगाव येथील म्हसोबा मंदिराजवळ मध्यरात्री विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यांसह त्यांच्या कर्मचार्‍यांवर तिघांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला असून, अभियंत्यांच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने हिसकावण्यात आले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (30 मे) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सहायक अभियंता राहुल सिताराम शिलावंत (वय 35, रा. शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सागर म्हस्के (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व त्याच्या दोन साथीदारांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 मे रोजी मध्यरात्री 12.45 वा. सुमारास केडगाव भागातील भूषणनगर येथे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शिलावंत यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश बेरड आणि बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ शंकर परभणे यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये फॉल्ट शोधण्याचे आदेश दिले. पहाटे 3.15 वा. सुमारास शिलावंत स्वतः घटनास्थळी दाखल झाले. फॉल्ट शोधत असताना सागर म्हस्के त्यांच्या जवळ आला व तुम्ही एमएसईबीचे कर्मचारी आहात का? फोन का उचलत नाही? लाईट का गेली? असे विचारून शिवीगाळ व दमदाटी करू लागला.

YouTube video player

शिलावंत यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले व खिशात ठेवले. यानंतर त्याने शिलावंत यांना जबरदस्तीने धक्काबुक्की केली. हे पाहून योगेश बेरड आणि शंकर परभणे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सागर म्हस्के याने लगेचच फोनवरून आपल्या दोन अनोळखी साथीदारांना बोलावून घेतले.

दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याने शिलावंत यांनी घटनास्थळी आपली दुचाकी सोडून परभणे यांच्या दुचाकीवरून तेथून निघून गेले. बेरड यांनीही आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर सागर म्हस्के व त्याचे दोन साथीदारांनी रंगोली चौकाजवळ शंकर परभणे यांना अडवून दगडाने मारहाण केली. शिलावंत यांनी पुढे वरिष्ठ अधिकारी व सहकार्‍यांना कळवून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...