Wednesday, June 17, 2026
HomeनगरAccident News : नगर-मनमाड महामार्गावर स्कॉर्पिओची तीन वाहनांना जोरदार धडक

Accident News : नगर-मनमाड महामार्गावर स्कॉर्पिओची तीन वाहनांना जोरदार धडक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- मनमाड महामार्गावरील (Ahilyanagar Manmad Highway) सावेडी नाका परिसरात गुरूवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगाने येणार्‍या स्कार्पिओ वाहनाने समोर असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक (Hit) दिल्याने मोठे नुकसान झाले असून या अपघातात दोघे जखमी झाल्याची नोंद तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री झाली होती. आणखी दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दोघे जखमी असल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, अपघातामुळे मनमाड महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

संपादकीय : शांततेचे ढग, की ट्रम्प यांची खेळी?

0
पश्चिम आशियाला युद्धाच्या भयंकर ज्वाळांमध्ये होरपळून टाकणारा अमेरिका-इराण संघर्ष तब्बल १०७ दिवसांच्या रक्तरंजित थरारानंतर अखेर थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ८०व्या...