Saturday, October 19, 2024
HomeनगरAhmednagar Crime News : धक्कादायक! शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला छेडले, मारहाण करत...

Ahmednagar Crime News : धक्कादायक! शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला छेडले, मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीची (वय 13) छेड काढत तिला मारहाण करण्यात आल्याची घटना गुरूवारी (17 ऑक्टोबर) सकाळी पावणे दहाच्या सुमारास अहिल्यानगर शहरात घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो, मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिकेत मार्कस खंडागळे, विवेक मार्कस खंडागळे, जिवन खंडागळे, शेवण खंडागळे (सर्व रा. लालटाकी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी गुरूवारी सकाळी शाळेत जात असताना पावणे दहाच्या सुमारास अनिकेत खंडागळे याने तिचा हात पकडून ‘आमच्या सोबत फिरायला चल’ असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीने त्याला नकार दिला असता त्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हाताच्या नखाने ओरखडे ओढले. पीडिताने सदरची घटना आई, वडिल व भावाला सांगितली. ते सर्व जण जाब विचारण्यासाठी अनिकेतच्या घरी गेले असता त्यांना अनिकेतसह विवेक खंडागळे, जिवन खंडागळे, शेवण खंडागळे यांनी शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडिताच्या कुटुंबाने गुरूवारी दुपारी तोफखाना पोलिसांना माहिती देत पीडिताच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव करत आहेत.

शाळेत असलेल्या अल्पवयीन मुलीला (वय 14) दुचाकीवरून चाँदबिबी महाल परिसरात घेऊन जात तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. कोणाला काही सांगितल्यावर जीवे मारून टाकण्याची व शाळेत जाणे बंद करण्याची धमकी दिली असल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेआठ ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सलमान आयुब पठाण (वय 20 रा. मुकुंदनगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या