Tuesday, March 25, 2025
Homeनगरसार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल; महानगरपालिकेचा दणका

सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल; महानगरपालिकेचा दणका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

झेंडीगेट परिसरातील बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणार्‍या जनावरांच्या मालकावर महानगरपालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. बंटी श्रीनिवास वायकर (रा. बंगाल चौक) असे त्याचे नाव आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणार्‍या जनावरांच्या मालकांवर यापुढे अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

- Advertisement -

बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपवर व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात. याठिकाणी जनावरांना नुकसान पोहोचवणार्‍या घटनाही वारंवार घडलेल्या आहेत. महानगरपालिकेने सदर जनावरांच्या मालकावर यापूर्वीही कारवाई केलेली आहे. मात्र महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर जनावरे बांधली जात असल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत सदर जनावरांच्या मालकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जनावराच्या मालकांनी आपली जनावरे आपल्या स्वतःच्या जागेत सुरक्षित ठिकाणी बांधावीत.

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, इतर नागरिकांना त्रास होईल, उपद्रव निर्माण होईल अशा पध्दतीने रस्त्यावर जनावरे बांधू नयेत. अन्यथा महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास जनावराच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...