Sunday, January 25, 2026
Homeनगरअहिल्यानगर महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणाली

अहिल्यानगर महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणाली

निर्णयांची अंमलबजावणी जलदगतीने होण्यास मदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ऑनलाईन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज, कामांचे प्रस्ताव, इतर प्रकरणांवर जलद निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत ‘ई- ऑफिस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. अशी प्रणाली राबवून ऑनलाईन कामकाज करणारी अहिल्यानगर महानगरपालिका ही ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये पहिलीच पालिका ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आयुक्त तथा प्रशासक डांगे यांच्या संकल्पनेतून ‘ई- ऑफीस’ प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना विभाग, संगणक विभाग, भांडार विभाग या विभागांचे कामकाज तात्काळ ‘ई- ऑफीस’ प्रक्रियेने सुरू करण्यात आले. मंगळवारी आयुक्त डांगे यांनी या प्रणालीचे उद्घाटन करून विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरीता सार्वजनिक सुट्टीचा आदेश डिजिटल स्वाक्षरी करून विभागांना ऑनलाईन जारी केला. ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी या प्रणालीवर सर्व कर्मचार्‍यांचे आयडी, डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयातील आस्थापना तक्ता अद्ययावत करण्यात आला आहे.

YouTube video player

त्यानुसार सर्व सॉफ्टवेअर संगणक विभागाकडून अद्ययावत करण्यात आले आहेत. ई- ऑफिस प्रणालीमध्ये फाईल्सचा जलदगतीने निपटारा होणार आहे. वेगवेगळ्या स्तरावर फायलींच्या मंजुरी, त्यावर होणारा मनुष्यबळाचा खर्च, वेळेची बचत होऊन तात्काळ निर्णय होणार आहेत. या प्रणालीमध्ये कामकाज पेपरलेस होवून, फायली सांभाळण्याकरिता लागणारी यंत्रणा, त्यावर होणार्‍या खर्चाची बचत तर होईलच, यासह फायली गहाळ होण्याचे टळतील, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

दरम्यान, ई- ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज पहिल्या टप्प्यात ऑनलाईन करण्यात येत आहे. सर्व विभागांचे कामकाज ई- ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत झाल्यावर दुसर्‍या टप्प्यात नागरिकांना ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या माहिती व सुविधा केंद्राचे कामही ई- ऑफिसच्या प्रणालीव्दारे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

कामकाजाला गती देण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय प्रस्ताव जलदगतीने मार्गी लागून नागरिकांची कामे वेळेत होतील.
– यशवंत डांगे, आयुक्त, महानगरपालिका

ताज्या बातम्या

Nashik News : घुमल्या घोषणा, दाटली गर्दी; नाशिकमधून ‘लाल वादळ’ मुंबईच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha)...