Tuesday, March 25, 2025
Homeनगरघंटागाड्यांवर आता क्युआर कोड

घंटागाड्यांवर आता क्युआर कोड

नगर महापालिकेचा उपक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात महापालिकेमार्फत सुरू असलेल्या कचरा संकलन कामावर लक्ष ठेवण्यासाठी, घंटागाडी वेळेत जाते की नाही, संबंधित भागातील कचरा उचलला गेला की नाही, यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घराला क्यूआर कोड बसविण्यात येणार आहे. काही भागात क्यूआर कोड असलेले स्टिकर लावण्यास सुरुवात झाली आहे. कचरा उचलल्यानंतर कर्मचार्‍यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

- Advertisement -

शहरात दररोज सुमारे दीडशे टन कचरा जमा होतो. कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेमार्फत घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शहरात अनेक भागात घंटागाडी पोहचत नसल्याच्या, नियमित आणि वेळेत घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून आता नागरिकांच्या घराला क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

क्यूआर कोड स्कॅन न केल्यास संबंधित भागातील कचरा उचलल्याची नोंद होणार नाही. त्यामुळे घंटागाडी आली नाही, कचरा उचलला नाही, अशा तक्रारी करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. शासनाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत क्यूआर कोड बसविण्याचे काम केले जात आहे. या कामास सुरूवातही झाली आहे. प्रारंभी संपूर्ण एका प्रभागातील घरांना हे क्यूआर कोड बसविण्यात येत आहेत. यामुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेवर महापालिकेची नजर असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...