Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : प्रोफेसर चौकातील गाळेधारकांना नोटीसा

AMC : प्रोफेसर चौकातील गाळेधारकांना नोटीसा

थकबाकीपोटी मनपाकडून जप्तीचा इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या गंज बाजार व सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवरही महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील गाळेधारकांकडे 27.28 लाख रूपयांची थकबाकी असून, तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील, अशा नोटीसा 32 गाळेधारकांना बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे 25 कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. यात प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे 27.28 लाख रूपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81(ब) नुसार कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

YouTube video player

महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. बहुतांश गाळेधारकांचे करारनामे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे थकीत रक्कम तत्काळ न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...