राहाता तालुका | प्रतिनिधी
राहाता बाजार समितीत काल कांद्याला 2300 रुपये भाव मिळाला. काल गुरवारी कांद्याच्या 13232 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1800 रुपये ते 2300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 800 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 रुपये ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 450 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 5140 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 190 रुपये ते 255 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 130 रुपये ते 180 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 60 रुपये ते 120 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये.
- Advertisement -
पेरू च्या 626 क्रेट्स ची आवक झाली. प्रतिकिलोला पेरू ला 20 ते 30 रुपये तर सरासरी 25 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




