Tuesday, May 26, 2026
Homeनगरगुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा विस्ताराचा आराखडा; जिल्ह्यात नवीन सहा डीवायएसपी कार्यालये,...

गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा विस्ताराचा आराखडा; जिल्ह्यात नवीन सहा डीवायएसपी कार्यालये, नऊ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, वाढणारी लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन जिल्ह्यात सहा नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालये तसेच नऊ नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून यापूर्वीच 550 नवीन अधिकारी-कर्मचार्‍यांचीही मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

पूर्वी जिल्ह्यात सहा नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र शासनाने नवीन निकष लागू केल्यामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर नवीन नियमांनुसार सुधारित प्रस्ताव तयार करून सहा डीवायएसपी कार्यालये आणि नऊ पोलीस ठाण्यांचा नव्याने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे आणि गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव, जिल्हाधिकार्‍यांसह इतर विभागांची नाहरकत प्रमाणपत्रे घेऊन संपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
.
सहा डीवायएसपी कार्यालयांचा प्रस्ताव

जिल्ह्यातील विद्यमान उपविभागीय कार्यालयांचे विभाजन करून सहा नवीन डीवायएसपी कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये कर्जत उपविभागाचे विभाजन करून श्रीगोंदा, श्रीरामपूरचे विभाजन करून राहुरी, शेवगावचे विभाजन करून नेवासा, शिर्डीचे विभाजन करून कोपरगाव, संगमनेरचे विभाजन करून अकोले आणि अहिल्यानगर ग्रामीणचे विभाजन करून पारनेर येथे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नऊ नवीन पोलीस ठाण्यांची मागणी

जिल्ह्यातील मोठ्या पोलीस ठाण्यांचा कार्यक्षेत्राचा भार कमी करण्यासाठी नऊ नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये पारनेर पोलीस ठाण्याचे विभाजन करून टाकळी ढोकेश्‍वर, कोतवाली व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करून केडगाव, पाथर्डीचे विभाजन करून खरवंडी कासार, शेवगावचे विभाजन करून बोधेगाव, राहुरीचे विभाजन करून देवळाली प्रवरा, श्रीगोंदाचे विभाजन करून मांडवगण, अकोलेचे विभाजन करून समशेरपूर व कोतुळ, तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे विभाजन करून सावेडी येथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर

0
पुणे | प्रतिनिधी Pune राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश अलीशा बागल यांनी मोठा...