Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

Ahilyanagar : कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

एसपी घार्गे यांचे आदेश || कर्मचार्‍यांची यादी सादर करण्याच्या सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व इतर शाखांतील सर्व पोलीस अंमलदारांसाठी दररोज बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी लावणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने ही अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हजेरी प्रक्रियेत पारदर्शकता, नियमितता आणि कर्मचारी उपस्थितीचा अचूक लेखाजोखा ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक शाखा प्रमुखाने आपल्या अधिनस्त कर्मचार्‍यांची बक्कल क्रमांकासह यादी तातडीने सादर करावी, अशा सूचना कार्यालयीन अधीक्षक सोपान काळभोर यांनी दिल्या आहेत. ही यादी कार्यालयीन शिपायामार्फत लेखा शाखेत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सायबर सेल, मोबाईल युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, लेखा विभाग, आस्थापना, विभागीय चौकशी शाखा यांच्यासह सर्व शाखांचा समावेश करण्यात आला आहे.

YouTube video player

पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार्‍या लिपिकवर्गीय कर्मचारी आणि पोलिसांसाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांना आता कार्यालयीन वेळेत यावे लागणार आहे. मात्र काही कर्मचार्‍यांनी याला छुपा विरोध दर्शविला आहे. आम्ही उशीरा आलो तरी आम्ही उशीरापर्यंत कार्यालयात थांबतो असे काहीचे म्हणणे आहे. मात्र अधीक्षक घार्गे यांनी आदेश काढल्याने याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे समजते. सध्या या आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाते आणि संभाव्य विरोधाचा कोणता परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंमलबजावणीपूर्वीच विरोध सुरू
या नव्या आदेशाविरोधात काही पोलीस अंमलदारांकडून सूचक स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही अंमलदारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही वेळेवर कार्यालयात हजेरी लावतो, मात्र ड्युटी संपल्यानंतरही अनेकदा अतिरिक्त वेळ काम करावे लागते. जर बायोमेट्रिक हजेरी सक्ती झाली, तर वेळेवर येणं अनिवार्य होईलच, पण वेळ वाढवून थांबण्यास आम्ही तयार राहणार नाही. यावर वरिष्ठांनी विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...