Thursday, September 10, 2026
HomeनगरAhilyanagar Crime : पहाटे जुगार अड्ड्यावर छापा; 29 जण पकडले

Ahilyanagar Crime : पहाटे जुगार अड्ड्यावर छापा; 29 जण पकडले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी धाड टाकत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण चार लाख 67 हजार 10 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने शुक्रवारी (8 मे) पहाटे ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सक्कर चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही जण तीनपत्ती नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुदर्शन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. यानंतर मुलगीर यांनी पोलीस अंमलदार दिलीप शिंदे, नंदकुमार पठारे, रवींद्र टकले आणि प्रमोद लहारे यांच्यासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत चंद्रकांत पवार (रा. स्टेशन रस्ता), दीपक बाळू वाघमारे (रा. सर्जेपुरा), सचिन प्रभाकर परदेशी (रा. मंगलगेट), सुरेश शीवदास नन्नवरे (रा. कायनेटीक चौक), मोजेस विन्सेन्ट सायगाम (रा. भिंगार), मनोहर विश्‍वनाथ कोडम (रा. तोफखाना), किसन शेटीबा पवार (रा. निंबळक), नैतीक संजय हंसे (रा. माळीवाडा), फुरकान शकील शेख, जावेद आय्युब शेख (दोघे रा. आशा टॉकीज चौक), संतोष रामभाऊ राशीनकर (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), युवराज भाऊसाहेब करंजुले (रा. मुकुंदनगर), रोहित विजय उमाप (रा. माळीवाडा), प्रकाश रमनलाल शहा (रा. आनंदीबाजार), शहारूख इक्बाल पठाण (रा. कोठला), फहीम अख्तार शेख (रा. मुकुंदनगर), अमोल गोरख आंबेकर (रा. भोयरे पठार, ता. अहिल्यानगर), अल्ताफ अल्लाउद्दीन शेख (रा. मुकुंदनगर), अन्सार गफुर शेख (रा. झेंडीगेट), सुनील मोहनलाल इसर (रा. भिंगार), हर्षद मनोज चावला (रा. पाईपलाईन रस्ता), सरवर अस्लम शेख (रा. झेंडीगेट), पुष्पक सुनील भोसले (रा. सर्जेपुरा), शीवम भास्कर जोशी (रा. पाईपलाईन रस्ता), आर्यन फारूख शेख (रा. आशा टॉकीज चौक), सोमनाथ नाथ विधाते (रा. पंचशीलनगर), सुनील बबन कांबळे (रा. सर्जेपुरा), गोटीराम दगडु आंधळे (रा. जवखेडा, ता. पाथर्डी), दस्तगीर मेहबुब शेख (रा. आशा टॉकीज चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...