Thursday, September 10, 2026
HomeनगरParner : भीषण अपघात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू

Parner : भीषण अपघात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू

पारनेर/शिरूर |तालुका प्रतिनिधी| Parner

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी (दि. 11) सायंकाळी कंटेनर, कार, दुचाकी व बसच्या भीषण अपघातात वाडेगव्हाणच्या (ता. पारनेर) सरपंच प्रियंका यादव यांचे पती व उद्योजक किशोर नामदेव यादव (वय 38) आणि दुचाकीस्वार प्रथमेश प्रकाश लाड (वय 30, रा. सुंदर सृष्टी, शिरूर, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर यादव कारने शिरूरला आले होते. हॉटेल संग्रामसमोरून यू-टर्न घेत असताना दुभाजकाजवळ प्रथमेश लाड दुचाकीसह थांबले होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने कारला धडक दिली. कार दुचाकीवर आदळल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या शिवाई बसने कार व दुचाकीला धडक दिली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन किशोर यादव यांचा, तर कार व बसमध्ये चिरडल्याने प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, कंटेनरचालक कंटेनरसह फरार झाला असून, अपघाताचे कारण व चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...