पारनेर | तालुका प्रतिनिधी
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिरूर तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सुपा औद्योगिक वसाहतीत मंळवारी रात्री हा भीषण अपघात झाला.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात श्रावण राजाराम मलगुंडे (वय 24) ,निलेश सुदाम पांचगे (वय 33), निखिल शिवाजी पांचगे (वय 21), संतोषा साहेबराव कोळेकर (वय 27) व प्रताप भाऊसाहेब पांचगे (वय 37) (सर्व रा. ढोक सांगवी ता. शिरुर) हे पाच तरुण गंभीर जखमी झाले आहे.
अहिल्यानगर- पुणे महामार्गाने कार क्रमांक MH 12 TD 8099 या गाडीने पुण्याकडून अहिल्यनगरच्या दिशेने जात असताना मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास सुपा औद्योगिक वसाहतीत एच पी पेट्रोल पंपा समोर नगर कडून आलेला मालवहतुक ट्रक वळण घेऊन सुपा औद्योगिक वसाहतीत वळत आसताना हे युवक वेगात आसल्याने याची कार वळण घेत असलेल्या ट्रकवर जोरात आदळून हा अपघात झाला.