Friday, January 23, 2026
HomeनगरAccident News : नगर-पुणे महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; एक ठार, तीन...

Accident News : नगर-पुणे महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सोमवारी दुपारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर (Ahilyanagar Pune Highway) पळवे शिवारात दोन कारचा भीषण अपघात (Car Accident) होऊन यात एकचा मृत्यू (Death) झाला असुन तीन जण जखमी झाले आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारी अहिल्यानगर-पुणे महामार्गावर (Ahilyanagar Pune Highway) पारनेर (Parner) तालुक्यातील पळवे खुर्द शिवारातील मठ वस्ती जवळ मारुती इरटिका कार क्रमांक एमएच 12 एसएल 0095 व टाटा पंच कार क्रमांक एमएच 02 जीजे 2785 या दोन कारचा भीषण अपघात (Accident) झाला. यात कैलास आबासाहेब बेंद्रे (वय 41 रा. आंबळे) यांचा मृत्यू झाला असुन अर्चना कैलास बेंद्रे (रा. आंबळे), विजय शिंदे (रा वाळवणे ता. पारनेर), एक महिला (नाव समजले नाही) हे जखमी (Injured) झाले आहे.

YouTube video player

अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे (Supa Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, अमोल धामने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...