Tuesday, January 6, 2026
Homeनगरअहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता

अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे या 125 किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा.लंके यांनी नगर शहर व आजूबाजूच्या गावांतील तरूण, सरकारी कर्मचारी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांसह मोठ्या संख्येने लोक काम, व्यवसाय, शासकीय सेवा आणि शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे ये- जा करतात.

- Advertisement -

या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दी यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे खा. लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केले होते. नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा होईल. याशिवाय माल वाहतूक, बोगी वाहतुकीच्या उद्देशाने रेल्वेला जोडल्यास त्यातून रेल्वेस उत्पन्न मिळेल. नगर आणि परिसरातील अनेक व्यापारी पुण्यातून माल खरेदी करतात आणि त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. त्यामुळे नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन ट्रायल आणि रन तत्वावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी खा. लंके यांनी संसदेमध्ये केली होती.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...