Tuesday, May 5, 2026
HomeनगरShirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी (Shirdi) येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे संकेत दिले. प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक मुम्मका (SP Mummaka Sudarshan) म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी लवकरच प्रभावी उपायोजना केल्या जातील. कायदा व सुव्यवस्थेबाबत काहीही प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी किंवा पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

माजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत सुदर्शन मुम्मका यांच्यासमोर अनेक प्रलंबित प्रकरणांच्या तपासाची मोठी जबाबदारी आहे. राज्यातील चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात (Bhondu Ashok Kharat) प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मर्यादित वेळ शिल्लक आहे. या प्रकरणातील पुराव्यांची साखळी मजबूत करणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान असेल. जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू तस्करी (Sand Smuggling) आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. प्रलंबित असलेले खून, दरोडे आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मार्गी लावण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे.

शिर्डीत (Shirdi) आगमन झाल्यानंतर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे आणि यैसैकर यांनी नूतन अधीक्षकांचे स्वागत केले. मर्यादित मनुष्यबळ आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने मुम्मुक्का जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला कशा प्रकारे नवी दिशा देतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...