Friday, May 23, 2025
HomeनगरAhilyanagar : सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; राकेश ओला यांची बदली

Ahilyanagar : सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; राकेश ओला यांची बदली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राकेश ओला यांची बदली पोलीस उपआयुक्त, बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे बदलून आले आहेत. ते रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अधीक्षक घार्गे यांनी यापूर्वी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. गृह विभागाने राज्यातील 21 पोलीस अधीक्षकांच्या बदलीबाबतचे आदेश गुरूवारी (22 मे) काढले.

राकेश ओला यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतला होता. त्यांचा कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय आणि प्रभावी ठरला आहे. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध पातळ्यांवर महत्त्वपूर्ण पावले उचलली. ओला यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली. खून, दरोडा, जबरी चोरीच्या घटनास्थळी अधीक्षक ओला स्वत: भेट देऊन तपासाबाबत सुचना करत असल्याचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण उल्लेखनीय राहिले. त्यांच्याच कार्यकाळात सुरूवातीला लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक पार पडली.

या काळात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील 17 हजारापेक्षा जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. ओला यांनी पदभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात दोन समाजाच्या गटांमध्ये तेढ निर्माण करणार्‍या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यावर देखील त्यांनी मात करून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अधीक्षक ओला यांना 13 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि नेतृत्वगुण अधिक दृढ झाले. ओला यांचा कार्यकाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरला आहे.

घार्गे पूर्वी श्रीरामपूरला होते कार्यरत
पोलीस अधीक्षक म्हणून आलेले सोमनाथ घार्गे यांनी पूर्वी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरोडा पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांना जिल्ह्याचा अंदाज आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलीस खात्यातील अधिकारी, अंमलदार यांच्या कुरघोड्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : टाकळीमियाचे ग्रामविकास अधिकारी निलंबीत

0
टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीस काही दिवस बाकी असतानाच जिल्हापरिषदेचे मुख्य अधिकारी यांना ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन ग्रामविकास...