Sunday, July 26, 2026
Homeक्राईमCrime News : अहिल्यानगरात दहशत माजविणार्‍या पठारे टोळीवर मोक्का

Crime News : अहिल्यानगरात दहशत माजविणार्‍या पठारे टोळीवर मोक्का

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणार्‍या विजय राजू पठारे व त्याच्या टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या टोळीविरूध्द मोक्का कायद्याची वाढीव कलमे लावण्यास मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

15 मार्च 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा, सून व नातू हे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून जात असताना संशयित आरोपींनी त्यांना अडविले. जुने भांडण मिटवून घेऊ, असे सांगत त्यांना झेडपी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ बोलावण्यात आले. त्यानंतर तेथे पोहोचताच विजय पठारे याच्या नेतृत्वाखालील टोळीने लोखंडी कोयता, तलवार व लाकडी दांडक्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर मारहाण केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. त्यामध्ये विजय पठारे व त्याच्या टोळीविरूध्द तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांनी टोळीप्रमुख विजय राजू पठारे याच्यासह अजय राजू पठारे, किरण मोहन जेधिया, सनी रणजित चावरे आणि नीलेश बाबासाहेब ससाणे (सर्व रा. सिध्दार्थनगर) या पाच आरोपींविरूध्द मोक्का कायद्याची वाढीव कलमे लावण्यास मंजुरी दिली.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी, २५ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....