Sunday, June 21, 2026
HomeनगरTeachers Bank Ahilyanagar : शिक्षक बँकेच्या सभेतही मराठा-ओबीसी वाद; नोकझोंक, शालजोडेंमुळे गुरूजींच्या...

Teachers Bank Ahilyanagar : शिक्षक बँकेच्या सभेतही मराठा-ओबीसी वाद; नोकझोंक, शालजोडेंमुळे गुरूजींच्या सभेत रंगत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

मागील वर्षी ओबीसीचे कारण पुढे करत संचालक मंडळात फुट पडत सत्तांतर करण्यात आले. त्यावेळी ओबीसींचा चेअरमन करण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांनी पुन्हा सर्वांना संधी मिळावी, म्हणून संचालक मंडळ एक झाले. आता पुन्हा मराठा समाजाचा चेअरमन करण्यात आला. तसेच स्वीकृत संचालक निवडताना खिरापत वाटू नका, मी देखील मराठा आहे, अशा शब्दांत ऐक्य मंडळाचे नेते शरद वांढेकर यांनी शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. या विषयांवर शिक्षक बँकेच्या सभेत काही काळ तणाव निर्माण झाला.

- Advertisement -

दरम्यान, सुरूवापासून नोकझोंक आणि एकमेकांना टार्गेट करताना शालजोडे मारण्याची एकही संधी शिक्षक नेत्यांनी सर्वसाधारण सभेच्या व्यासपिठावरून सोडली नाही. यंदाच्या सभेची जमेची बाजू ऐवढीच शिक्षक बँकेच्या सभेत हाणामाऱ्या, चढाओढ, हमरी-तुमरी, एकमेकांना शिव्या देणे हे प्रकार टाळले गेले. दोन सत्रात झालेल्या या सभेत बँकेचा घटलेला लाभांश, नोकर भरती, शेड्यूल बँकेचा दर्जा आणि बँकेतील एमडी नियुक्ती या विषयावर साधकबाधक चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी मंडळाचे संचालक यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांनी सत्ताधारी मंडळ व नेत्यांवर आरोप केले.

सकाळच्या टप्प्यात तणावपूर्ण वातावरणात चर्चा झाल्यानंतर जेवणासाठी एक तासाची सुट्टी घेण्यात आली. त्यानंतर पहिल्याच्या मनोगतात ऐक्य मंडळाचे नेते वांढेकर यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी त्यांनी संचालक मंडळाने पारदर्शकपणे कर्मचाऱ्यांचा पगार अदा केल्याबद्दल संचालकांचे अभिनंदन केले. त्यांच्या बोलवण्यावर संजय धामणे यांनी आक्षेप घेतला. त्यावर वांढेकर यांनी पारदर्शक म्हणजे संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी काढलेल्या ७६ लाख रुपयांचा फरक कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही, असे सांगितले. त्यावर सत्ताधारी गटाच्या शिक्षकांनी वांढेकर यांना आता तुमची लाईट गेली अशी टिप्पणी केल्यावर काळजी करून नका, आमची लाईट लागणार आहे. आम्ही अंधारात राहणार नाही. सत्ताधारी संचालक मंडळात मागील वेळी ओबीसीच्या मुद्यावर फुट पडली आणि ओबीसींचा चेअरमन करण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांत सर्वांना संधी मिळावी, म्हणून फुट पडलेले संचालक मंडळ पुन्हा एकत्र आले. आता सर्वांनी मिळून मराठा चेअरमन केला यासाठी सर्वांचे चेअरमन असे म्हणताच, सत्ताधाऱ्यांचे सभासद संतप्त झाले.

वांढेकर यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी व्यासपिठ शेजारी असणाऱ्या छोट्या व्यासपिठावर माईकवर बोलणाऱ्या वांढेकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना बोलवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून सभेत काही तणाव निर्माण झाला. यावेळी वांढेकर यांनी मी देखील मराठा आहे, असे म्हणताच शिक्षकांनी जातीची कदर करा, काही बोलू नका, अशा शब्दांत वांढेकर यांच्या बोलवण्यावर राग व्यक्त केला. मात्र, या घटनेवरून शिक्षक बँकेच्या राजकारणात मराठा-ओबीसी वाद असल्याचे दिसून आले. सध्याच्या शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात २१ संचालकांपैकी जवळपास १५ संचालक ओबीसी असल्याचे या ठिकाणी उपस्थित असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तसेच यापुढे संचालक मंडळ आता कोणाचे नाही. कोणत्याचे नेत्याचा आदेश संचालक मंडळाला बांधील नाही, असे काही वक्त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता तालुक्यातील 22 गावांची पोलीस पाटील भरती रखडली

0
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal राहाता तालुक्यातील 22 गावांच्या रिक्त झालेल्या पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया रखडली आहे. भरतीसाठी आरक्षण सोडतीही पार पडल्या आहेत. मात्र राजकीय...