Thursday, September 17, 2026
HomeनगरCrime News : महिला कामगाराचा छळ, भावास मारहाण; केडगाव औद्योगिक वसाहतीतील प्रकार

Crime News : महिला कामगाराचा छळ, भावास मारहाण; केडगाव औद्योगिक वसाहतीतील प्रकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
केडगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणार्‍या महिलेला कामाच्या ठिकाणी सतत त्रास देणार्‍या व्यक्तीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. दरम्यान, त्रास देणार्‍याने गुरूवारी (12 जून) पीडित महिलेच्या भावास लोखंडी रॉडने मारहाण केली, तर महिलेसही मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
महेंद्र मेढे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. दीपनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी एका कंपनीमध्ये गेल्या वर्षभरापासून हेल्पर म्हणून कार्यरत आहेत. पती पुण्यात कामानिमित्त राहत असून दोन मुलांसह त्या उपनगरात वास्तव्यास आहेत. महेंद्र मेढे हा गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेला सतत विनाकारण बोलण्याचा, पाठलाग करण्याचा आणि अश्‍लिल विनोद करून त्रास देत होता.
बुधवारी (11 जून) दुपारी 3 वाजता, पीडित महिला पाणी पिण्यासाठी कंपनीच्या परिसरात असताना महेंद्र मेढे याने तिला त्रास देत हात पकडला. घाबरलेल्या महिलेने तात्काळ हात झटकून तिथून दूर झाली आणि कामावर परत गेली. याबाबत तिने कंपनी मॅनेजरकडे तक्रार केली होती. दुसर्‍या दिवशी गुरूवारी (12 जून) सकाळी 10.30 वाजता, पीडितेचा भावाने महेंद्र मेढे यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने रागाने भावासह पीडितेला शिवीगाळ करत धमकी दिली व मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पहिल्या खुनातून सुटला, पुन्हा खून केला अन्...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik एका खुनाच्या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाकडून (High Court) कलम बदलून सुटका (कमी शिक्षा) होऊन अवघे सात महिने झाले होते, तिथेच पुन्हा...