अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची नव्याने माहिती घेवून त्यांची नोंदी ऑनलाईन पोर्टलवर घेण्यात येणार आहे. यासाठी खास कार्यक्रम आखण्यात येणार आहे. यापूर्वी असा प्रयोग ठाणे जिल्हा परिषदेने राबवलेला आहे. मात्र, त्यापेक्षाही अद्याप प्रयोग नगर जिल्हा परिषद राबवणार आहे. यासह ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नमुना दाखले, त्यांचे बजेट, कर आकरणी यासह ग्रामसभांचे इतिवृत्त यांचे रेकॉर्ड ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.
साधारण महिनाभरापूर्वी भंडारी यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली असून यापूर्वी सुरू असणार्या योजना आणि उपक्रम राबवणे सुरू ठेवण्यासोबत जिल्हा परिषदेची मालमत्तांच्या माहितीचे पोर्लट सुरू करण्यासाठी भंडारी यांनी योजना आखली आहे. यासाठी प्राथमिक स्तरावरील अधिकार्यांच्या बैठक घेवून सुचना देण्यात आल्या असल्याचे भंडारी यांच्यावतीने सांगण्यात आले. नगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्याला मार्गदर्शक ठरले असे नियोजन करण्यात येत आहे. मागील महिन्यांत ठाणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची माहिती ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रयोग काही प्रमाणात सिमीत असून नगर जिल्हा परिषद व्यापक प्रमाणात पुढे जावून ही माहिती अद्यावत करणार आहे.
यासाठी आधी नव्याने जिल्हा परिषदेच्या तालुकानिहाय मालमत्तांची माहिती संकलित करून तीचे डिजेटाईलेजेशन करण्यात येणार आहे. यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ऑनलाईन करण्यावर भंडारी यांचा प्रयत्न आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांना कार्यक्रम आखण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार्या विविध आपलं सरकार सेवा केंद्रातून घरपोहच दाखले देण्यासाठी ग्रामपंचायत विभाग कार्यरत आहे. यात नागरिकांना 402 दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
निविदा प्रक्रिया ते कार्यरंभचा वेळ कमी करणार
जिल्हा परिषदेत मंजूर कामावरील निधी वेळेवर खर्च व्हावा. यासाठी राबवण्यात येणार्या निविदा प्रक्रिया ते कार्यरंभ आदेशाच्या प्रक्रियेत एकच फाईल अनेक टेबलावरून फिरते. यात मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने हा वेळ कमी करण्यासाठी अर्थविभागाशी सल्लामसलत करून वेळ वाचवण्यासाठी उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी सांगितले.





