Saturday, May 4, 2024
Homeनगरअहमदनगर : 1 हजार 333 ज्येष्ठांनी घेतली करोना लस

अहमदनगर : 1 हजार 333 ज्येष्ठांनी घेतली करोना लस

अहमदनगर (प्रतिनिधी) –

45 ते 60 वर्षे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना करोना लस देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर या मोहिमेस जिल्ह्यात हळूहळू प्रतिसाद

- Advertisement -

वाढू लागला आहे. गुरूवारअखेर शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 45 ते 60 वर्षे आणि 60 वर्षापेक्षा अधिक वय असणार्‍या 1 हजार 333 ज्येष्ठांनी लस घेतली. दुसरीकडे खासगी रूग्णालयांमध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दररोज 100 प्रमाणे डोसची मागणी पैसे भरून नोंदवली आहे. काल जिल्ह्यातील 20 खासगी रुग्णालयात करोना लस देण्यात आली.

शासनाने 1 मार्चपासून साठ वर्षांवरील, तसेच व्याधीग्रस्त 45 वर्षांवरील नागरिकांना करोना लस देण्याची घोषणा केली आहे. शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत, तर खासगी रुग्णालयांत 250 रुपयांना उपलब्ध होणार आहे. मात्र पहिल्या दिवशी लसीकरणासाठी नोंदणी करण्यात अडथळे आल्याने लसीकरण प्रक्रिया कोलमडली. मंगळवारी लसीकरणास सुटी होती. बुधवारी आणि गुरूवारी मात्र लसीकरण मोहीम सुरळीत सुरू झाली.

कालअखेर जिल्ह्यातील 14 ग्रामीण रूग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात 60 वर्षांवरील एकूण आणि 45 ते 60 वर्षे व्याधी असणार्‍या 1 हजार 333 जणांनी लस घेतली. यात गुरूवारी 219 हे 60 वर्षापेक्षा जास्त वय असणारे असून 38 हे 45 वर्षे असणारे आहेत. लसीकरण मोहिमेस आता गती येत असून लस घेणारांचाही प्रतिसाद वाढत आहे. सध्या जिल्हा रूग्णालय, 2 उपजिल्हा रूग्णालये, 11 ग्रामीण रूग्णालये, तसेच मनपाच्या आठ रूग्णालयांत मोफत लस उपलब्ध आहे. कोवीन डॉट जीओव्ही डॅाट ईन या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर संबंधिताला जवळच्या केंद्रावर लस उपलब्ध होत आहे.

……………..

20 खासगी रूग्णालयांत कालपासून लसीकरण

जिल्ह्यात 32 खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्र जाहीर झाले आहेत. तेथे अडिचशे रूपयांत लस मिळणार आहे. या रूग्णालयांनी शासनाकडे लसीचे पैसे भरले असून त्यांच्या मागणीप्रमाणे जवळच्या ग्रामीण रूग्णालयांतून त्यांना लस उपलब्ध होत आहे. गुरूवारी 20 खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू झाले असून त्यांनी दररोज 100 डोसची मागणी केली आहे.

…………………

- Advertisment -

ताज्या बातम्या