Saturday, July 27, 2024
Homeनगरनगरमधील ‘त्या’ प्रमुख 15 रस्त्यांची कामे लागणार मार्गी

नगरमधील ‘त्या’ प्रमुख 15 रस्त्यांची कामे लागणार मार्गी

अहमदनगर (प्रतिनिधी)

शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनाकडून मिळवलेल्या नगर शहरातील विकासकामांच्या 15 कोटी रूपयांच्या निधी खर्चाला सत्तांतरानंतर स्थगिती देण्यात आली होती. ठाकरे – शिंदे गटाच्या राजकारणात सिव्हील हडको, केडगाव व इंडस्ट्रीयल इस्टेट मधील 15 प्रमुख रस्त्यांची कामे रखडली होती. आता या निधी खर्चाची स्थगिती सरकारकडून उठवण्यात आल्याने या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर शहरात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला. यात सुमारे 15 कोटींच्या निधीतून केडगाव, इंडस्ट्रीयल इस्टेट व सिव्हील हडको येथील रस्त्यांची कामे प्रस्तावित होती. या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. त्यामुळे या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र, ठाकरे – शिंदे गटातील राजकीय वादातून या कामांना 25 जुलै 2022 रोजी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ही कामे रखडली होती. आता राज्य सरकारने या निधीला दिलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळे येत्या काळात सिव्हिल हडकोतील मेघाग्नी चौक ते हिरानंदानी मार्ग ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब व पराग कॉर्नर ते भगत मळापर्यंत रस्त्यासह केडगाव, इंडस्ट्रीयल इस्टेट मधील कामे मार्गी लागणार आहेत.

तसेच, केडगाव येथे झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर येथे राधेश्याम कॉम्प्लेक्स ते फुंदे घर, अयोध्यानगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजीनगर सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोड, इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अर्बन बँक ते सुमेश इंडस्ट्रीज, महावीर इंडस्ट्रीज ते सौरभ इंडस्ट्रीज, मे. नेक टेक्निकल ते सारडा फॅशन्सपर्यंत, टो इंजिनिअर्स ते चोपडा पॉलीपर्यंत, मे.धनलक्ष्मी एंटरप्रायझेस ते न्यु दत्त मुद्रणालयपर्यंत, मे. सुप्रिम इंडस्ट्रीयल ते आझाद सॉ मीलपर्यंत, यशका इंडस्ट्रीज ते मायक्रोटेक इंडस्ट्रीज, ओम इलेक्ट्रीकल्स ते सुचि इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल गेट ते नवकार स्टोअर व रूपरतन मेटल ते महावीर फरसाणपर्यंत अशी 15 रस्त्यांची कामे होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या