अहमदनगर । प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज (शनिवार) करण्यात येणार आहे. ज्या पोलीस अंमलदारांना 31 मे, 2024 रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते.
अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 11 वाजता बोलविण्यात आले आहे. प्रत्येक अंमलदारांना विचारून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणानुसार बदली देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
हे देखील वाचा : दूध दराबाबत मंत्री विखे पाटलांचे केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र; केली ‘ही’ मागणी
जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात येणार आहे. बदलीपात्र पोलीस अंमलदारांकडून तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून तसे विनंती अर्ज प्रभारी अधिकार्यांमार्फत मागविण्यात आले आहे.
एका पोलीस ठाण्यात खंडीत/अखंडीत सेवा धरून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झालेले अंमलदार, एका तालुक्यामध्ये एका पेक्षा जास्त पोलीस ठाणे असल्यास त्या तालुक्यामध्ये कमाल कालावधी सर्व संवर्गातील खंडीत अथवा अखंडीत सेवा धरून 12 वर्ष पूर्ण झालेले अंमलदार तसेच विविध शाखेत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी (अखंडी/अखंडीत) पूर्ण केलेल्या अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहे. यामध्ये 435 पोलीस अंमलदार व 41 पोलीस चालक अंमलदार अशा 476 पोलिसांच्या बदल्या करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : हिट अॅण्ड रन! अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी
आज सकाळी 11 वाजता बदलीसाठी पोलिसांचा दरबार येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भरणार आहे. पोलीस अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, पोलीस उपअधीक्षक (गृह) हरीष खेडकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत या बदल्या करण्यात येणार आहे. बदलीपात्र हजर झालेल्या पोलीस अंमलदार यांच्याकडे तीन पसंती ठिकाणाची विचारणा करून त्यातून एका ठिकाणी त्यांची बदली करण्यात येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा