Thursday, September 19, 2024
Homeनगरजिल्ह्यात 'लाडकी बहीण योजने'साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती...

जिल्ह्यात ‘लाडकी बहीण योजने’साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले पात्र? आकडेवारी समोर

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 8 हजार अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे.

दरम्यान, या अर्जांपैकी 25 हजार महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून ते तात्पूर्ते रिजेक्ट करण्यात आल्यानंतर महिलांनी पुन्हा माहिती सादर केल्यानंतर त्यांची पुर्नपडताळणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत नगर जिल्ह्यात 6 लाख 80 हजार महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील 7 लाख 8 हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत 6 लाख 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र झाले आहेत. 25 हजारांहून अधिक अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे हे अर्ज पुन्हा अर्जदाराकडे त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात आले होते. या अर्जाबाबत संबंधीत महिलांनी माहितीची पुर्ता केल्यामुळे त्यांची पुर्नपडताळणी सध्या सुरू आहे.

हे ही वाचा : Pune Hit And Run : पुन्हा ‘हिट अँड रन’, चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं फरफटत

रक्षाबंधनचा मुहूर्त साधत राज्य सरकारकडून 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. अर्जांची पडताळणी व योजनेच्या संनियंत्रणासाठी अशासकीय सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे.

यासाठी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनूसार तालुकास्तरावर वॉर रुम तयार करण्यात आले असून याठिकाणी महसूल, जिल्हा परिषदेसह अन्य विभागाची यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती योजनेचे नोडल अधिकारी मनोज ससे यांनी दिली.

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडणार; ‘या’ तारखांपासून महायुती, महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटणार

अशा आहेत त्रुटी

कागदपत्रे अपूर्ण असणे, आधारकार्डची एकच बाजू अपलोड, माहिती अपूर्ण, बँक डिटेल नसणे, हमीपत्रावर स्वाक्षरी नाही अशा विविध त्रुटी अर्जांमध्ये आढळल्या आहेत. त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यास मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून अर्ज केला आहे आणि त्यांच्या अर्जात त्रुटी आहे अशांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. तर ज्यांनी महा-ई-सेवा केंद्रांवर किंवा अंगणवाडी सेविकांसह अन्य ठिकाणी अर्ज केले आहेत, त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर त्रुटी पूर्ततेचे मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात 17 ऑगस्टला पैसे मिळतील, अन्यथा त्यांना पुढील टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार आहे.

हे ही वाचा : पुण्यात भरचौकात गुंडाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पात्र लाडक्या बहिणी

अकाले 43 हजार 783, संगमनेर 83 हजार 788, कोपरगाव 41 हजार 403, श्रीरामपूर 45 हजार 19, नेवासा 56 हजार 19, शेवगाव 36 हजार 455, पाथर्डी 34 हजार 36, जामखेड 26 हजार 697, कर्जत 36 हजार 719, श्रीगोंदा 42 हजार 614, पारनेर 43 हजार 791, राहुरी 53 हजार 236, राहाता 52 हजार 569 आणि नगर 80 हजार 847 असे 6 लाख 76 हजार 976 अर्ज पात्र ठरले आहेत. ही आकडेवारी शुक्रवारी दुपारी 4 पर्यंत आहे. त्यात सायंकाळी वाढ झालेली असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा : सत्तेतील सहभागामुळे विकासाची कामे – उपमुख्यमंत्री अजित पवार

- Advertisment -

ताज्या बातम्या