Saturday, May 25, 2024
Homeनगरकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळेंवर विनयभंगाचा गुन्हा

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळेंवर विनयभंगाचा गुन्हा

अहमदनगर | प्रतिनिधी

बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून विनयभंग, दमदाटी केल्याप्रकरणी काँग्रेसचे अहमदनगर (Ahmednagar Congress) शहर जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे (Kiran Kale) यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी (MIDC) येथील आयटी पार्कशी (IT Park) संबंधित असलेल्या महिलेने फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी (MIDC) येथील आयटी पार्कला (Ahmednagar IT Park) गुरूवारी भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील बजाज फायनान्स (Bajaj Finance), बजाज फिन्सर कंपनीचे (Bajaj Finser Company) कॉल सेंटर (Call Center) येथे बळजबरीने प्रवेश करून येथील फिर्यादी महिलेचा हात पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तसेच कार्यालयातील इतर महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा (Congress Party) शहर जिल्हाध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केले. अशी फिर्याद पिडीत महिलेने दिली आहे. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ahmednagar Police Sation) विनयभंग, दमदाटी, शिवीगाळ कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या